20 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे अटकेत

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
crime news Police Dhananjay Gange arrested taking bribe Rs 20000 dombivali mumbai
crime news Police Dhananjay Gange arrested taking bribe Rs 20000 dombivali mumbai sakal

डोंबिवली - उसाटने गावातील एका कंपनीत अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कंपनीने कामगार सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करून घेण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे यांनी 25 हजार रुपयांची लाचची मागणी केली होती. तडजोडीअंती नेवाळी चौकी येथे 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गणगे यांना गुरुवारी रंगेहाथ अटक केली आहे.

हिललाईन पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी चौकीत पहिल्यांदाच लाच लुचपत विभागाची कारवाई झाली आहे. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणगे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रार दार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. दाखल तक्रारीवरून गुरुवारी नेवाळी चौकीत सापळा रचला. गणगे यांनी तक्रारदार यांच्याकडून 20 हजार स्वीकारताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या. याचा अधिक तपास लाचलुचपत विभाग करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com