ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दस्तऐवज चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागरे यांनी कर्मचाऱ्याकडे चौकशी करून दस्तऐवज न सापडल्याने कार्यालयातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात कदम यांनी फाईल पळवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने नागरे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अनधिकृत प्रवेश करून वाहनचालक आणि वाहतूकदारांच्या दस्तऐवजाची फाईल चोरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. हा सर्व प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाला. याप्रकरणी आरटीओचे वरिष्ठ लिपिक नितीन नागरे यांनी फाईल चोरणारे ज्ञानेश्‍वर कदम यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नागरे यांच्या टेबलवर गुरुवारी दुपारी काही अर्जदारांनी वाहन नोंदणी व इतर कामकाजासाठी आपली कागदपत्रे दिली होती. त्यानंतर नागरे दुपारी जेवणासाठी गेल्याची संधी साधून मे. साई मोटार ट्रेनिंग स्कूलचे मालक म्हणवणाऱ्या ज्ञानेश्‍वर कदम यांनी आरटीओ कार्यालयातील कॅबीनमध्ये अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर टेबलवरील वाहन नोंदणी प्रमाणपत्र, बाफना मोटर्स यांनी दिलेल्या वाहन विक्रीची कागदपत्रे, मोटार वाहन मालकाच्या वास्तव्याचे आणि ओळखपत्र दस्तऐवजाची फाईल पळवली. 

नागरे यांनी कर्मचाऱ्याकडे चौकशी करून दस्तऐवज न सापडल्याने कार्यालयातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात कदम यांनी फाईल पळवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने नागरे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Crime News Thane RTO Documents have been theft by someone