
Mumbai News : मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी दिल्ली नोयडातून अटकेत
मुंबई : मर्चट नेव्हीत नोकरी देण्याच्या निमित्तानं बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपींना साकीनाका पोलिसांनी नोएडा, दिल्ली येथून अटक केली आहे.शिवमकुमार राजेशकुमार गुप्ता, उदीत कमल सिंग, सिद्धार्थ कमल बाजपेयी अशी आरोपींची नावे आहेत.
मर्चंट नेव्हीच्या नावे फसवणूक
या प्रकरणात आरोपींनी मर्चेन्ट नेव्हित नोकरी देण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये साकीनाका परीसरात "अग्याता मरिन्स अलाईस शिपमेन्ट" या कंपनीच्या नावाने कार्यालये उघडले. या कंपनीद्वारे मर्चन्ट नेव्हित नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून रोख तसेच बँक खात्यांवर पैसे घेण्यात आले. तसेच पिडीत उमेदवारांचे पासपोर्टस् तसेच सि.डी.सी. ताब्यात घेतले.
एके दिवस आरोपी अचानक कार्यालय बंद करून दिलेले पैसे व कागदपत्र घेऊन पळून गेले. याप्रकरणात पिडीत उमेदवारांकडून साकीनाका पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपींनी आतापर्यन्त विविध उमेदवाराकडून एकुण 43 लाख रूपयांची फसणूक झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.
पोलीस तपास
तांत्रीक तपासाच्या आधारे यातिल आरोपी यांचे कॉल सेन्टर नोएडा, दिल्ली येथे असल्याचे व तेथून अशा प्रकारचे गुन्हे हाताळले जात असल्याचे पोलिसाना लक्षात आले. नोएडा दिल्ली येथे तातडीने पोलीस पथक दाखल झाली.
तेथे तांत्रीक तपास केला असता आरोपी नोएडा येथे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये चालवत असल्याचे आणि वेगवेगळया ठिकाणी फ्लॅटस् घेऊन रहात असल्याचे समोर आले. पथकाने तांत्रीक तपास करून यातिल मुख्य सुत्रधार आरोपी शिवम कुमार गुप्ता व उदित सिंग यास नोएडा येथून अटक केली आहे.
गुन्हयात एकुण तिन आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपीचे वेगवेगळे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तसेच तपासादरम्यान फिर्यादी व पिंडीत यांचे एकूण 127 पासपोर्टस् व सि.डी.सी. हस्तगत करण्यात आले आहेत.