पर्ल्स कंपनीविरोधात गुन्हे दाखल - केसरकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील गुंतवणूकदारांची तब्बल 28 कोटी 50 लाख रुपयांची लुबाडणूक पर्ल्स या कंपनीच्या विरोधात "एमपीआयडी' अन्वये गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगून कोल्हापूरच्या गुंवणूकदारांचे पैसे परत केल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. कोल्हापूरसह राज्यभरातील गुंतवणूकदारांची पर्ल्स कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी सतेज पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यातील गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकले असल्याने कंपनीच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

कंपनीच्या विरोधात राज्यभरात आठ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून कोल्हापुरातील गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत केल्याची माहिती केसरकर यांनी दिली. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार नवीन कडक कायदा तयार करत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. या वेळी सतेज पाटील यांनी "एमपीआयडी' कायद्याची आठवण राज्य सरकारला करून दिली. केंद्राचा कायदा होईल तेव्हा होईल. मात्र, तोपर्यंत "एमपीआयडी' कायद्यान्वये गुन्हे दाखल झाल्यास गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल, असे सतेज पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. यावर या कायद्यान्वये पर्ल्स कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले.

Web Title: crime on pulse company