राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई - छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 16) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

काही वृत्तवाहिन्या, तसेच फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप या सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राज ठाकरे यांनी अपमानजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे लाखो शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष अमरदीप देशमुख यांनी सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केली आहे.

Web Title: crime on raj thackeray