
Accident News : वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
डोंबिवली - कल्याण येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री एका वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याघटनेची महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.
शिवाजी चौकातील इमेज शोरुम दुकाना समोरुन शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता एक पादचारी पायी चालला होता. त्यावेळी भरधाव वेगाने एक वाहन चालक तेथून जात असताना त्याच्या निष्काळजी पणामुळे वाहनाची जोरदार धडक पादचाऱ्याला बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तोपर्यंत वाहन चालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने हवालदार मयूर तरे यांच्या तक्रारीवरून चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.