esakal | महिलेसह मुलाला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

महिलेसह मुलाला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघरमधील कोपरा गावात महिलेस बेदम मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करून मुलासह उदरनिर्वाह करणाऱ्या एका तेहतीस वर्षीय महिलेच्या दिव्यांग मुलास शेजारच्या मुलांनी मारहाण केल्याने महिलेने मारहाण केलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन मुलांना समज द्यावी, असे सांगितले; मात्र सदर कुटुंबातील मुलगा आणि त्याच्या आईन महिलेलाच मारहाण केली.

हेही वाचा: जर्मनीत सत्ताबदल: कौल मध्यम डाव्या विचारसरणीला!

यात तिच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी खारघरमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून १० दिवसांनी गुन्हा दाखल केला. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने महिलेस मारहाण करूनही दबावापोटी पोलिस तक्रारीकडे दुर्लक्ष करीत होते; मात्र याबाबत पाठपुरावा केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे काँग्रेसच्या कार्यकत्या सारा अहमद यांनी सांगितले.

loading image
go to top