'केडीएमसी'च्या गलथान कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मनसेसैनिकांवर गुन्हे दाखल; व्हेंटिलेटर धूळखात पडल्याचे प्रकरण केले होते उघड

'केडीएमसी'च्या गलथान कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मनसेसैनिकांवर गुन्हे दाखल; व्हेंटिलेटर धूळखात पडल्याचे प्रकरण केले होते उघड

ठाणे ः डोंबिवली जिमखाना येथे पालिकेच्या वतीने ऑक्‍सिजन आणि आयसीयूयुक्त कोव्हिड रुग्णालय उभारण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालय, तसेच व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी धडपड करी असताना जिमखाना येथेच पंतप्रधान निधीतून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर दीड महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत पालिकेचा हा गलथान कारभार मंगळवारी (ता. 11) उघड केला होता. मात्र, या आंदोलनाची परवानगी न घेतल्याने मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह चार जणांवर टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवली जिमखाना येथे पालिका प्रशासनाच्यावतीने प्रस्तावित कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आहे. 15 जुलैपर्यंत हे रुग्णालय सुरू होईल, असे सांगण्यात आले होते; परंतु महिना उलटला तरी या कोव्हिड रुग्णालय उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम व त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 11) आंदोलन केले होते. तसेच जिमखाना येथे पंतप्रधान निधीतून आलेले व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याची बाब त्यांनी उघड केली होती. 

मात्र, मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम व त्यांचे इतर चार साथीदार मंगळवारी डोंबिवली जिमखाना येथे कोणतीही परवानगी न घेता आले. त्यानंतर त्यांनी येथील व्हेंटिलेटरचे बॉक्‍स उचलून वाहनात ठेवले. नंतर पुन्हा ते बॉक्‍स वाहनातून काढून कोव्हिड सेंटरमध्ये ठेवले. याप्रकरणी सुरक्षा रक्षक संदीप पांगारकर यांनी राजेश कदम यांसह चार जणांविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आम्ही सत्यपरिस्थिती दाखविली. गुन्हा महापालिका अधिकाऱ्यांवर दाखल व्हायला पाहिजे. परंतु यामागे वेगळाच हेतू असल्याचे दिसून येत आहे. पाच महिने आम्ही सहन केले, आता आम्ही जाब विचारणारच. असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायची आमची तयारी असून आता आम्ही प्रशासनाची पोलखोल करणार. 
- राजेश कदम, शहराध्यक्ष, 
मनसे डोंबिवली

----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com