व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - भारतीय चलन घेऊन डॉलर देतो, असे सांगून व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या दोघांना थरारक नाट्यानंतर अटक करण्यात आली. इम्रान दादान अन्सारी आणि फरजाना अमरउल्ला शेख अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी पोलिसांनी पकडू नये म्हणून नोटा रेल्वे रुळावर फेकल्या होत्या.

दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाला भारतीय नोटांच्या मोबदल्यात डॉलर हवे होते. त्यासाठी तो मंगळवारी सायंकाळी मित्रासोबत पवईतील तुंगा गावात अन्सारी आणि शेख यांना भेटण्यासाठी गेला होता; परंतु या व्यावसायिकाचा मित्र काही वेळात महत्त्वाच्या कामासाठी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात गेला. त्या वेळी अन्सारी आणि शेख हे व्यावसायिकाचे तीन लाख रुपये घेऊन पळून गेले. ही माहिती व्यावसायिकाने त्याच्या मित्राला कळवली. योगायोगाने त्याचा मित्र हा कांजुरमार्ग स्थानकात होता. त्याने अन्सारी आणि शेख यांना पाहिल्यानंतर आरडाओरड केला. पोलिसांपासून वाचण्याकरता अन्सारीने रेल्वे रुळावर उडी मारली, तर शेखने पैशांचे बंडल रेल्वे रुळावर फेकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: criminal arrested crime