'पप्पू' ट्विट कंगनाला पडणार महागात, आणखी एक फौजदारी तक्रार दाखल

पूजा विचारे
Friday, 23 October 2020

कंगनाच्या आणखी एका ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने आक्षेपार्ह ट्वीटद्वारे न्यायव्यवस्थेचाही अवमान केला, असा आरोप करत अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाच्या  गुन्ह्याप्रकरणी समन्स पाठवण्यात आले आहेत. कंगनाच्या बहिणीलाही समन्स पाठवण्यात आले.  दोघांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.  कंगनाने  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं उत्तर दिलं होतं.  कंगनानं मुंबई पोलिसांना महाराष्ट्राचे पप्पू म्हटले. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले. आता हेच ट्विट तिला महागात पडणार आहे. 

कंगनाच्या आणखी एका ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने आक्षेपार्ह ट्वीटद्वारे न्यायव्यवस्थेचाही अवमान केला, असा आरोप करत अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. न्यायपालिकेविरूद्ध 'दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक' ट्वीट पोस्ट केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

वकीलांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.   पोलिसांनी या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

समन्सला कंगनाचं उत्तर

कंगनानं मुंबई पोलिसांना महाराष्ट्राचे पप्पू म्हटले. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले आहे.  तिनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.

कंगना आणि रंगोली यांच्यावर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघींना पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंगना करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. कास्टींग डायरेक्टर मुनावर अली उर्फ साहिल सय्यद यांनी ही याचिका दाखल केली होती. समाजमाध्यमांत तसेच टीव्हीवर सगळीकडे बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलिवूड विरोधात माहिती पसरवली जात आहे. कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अधिक वाचा-  आरेमधील वृक्षतोड केलेल्या भकास जागेवर वृक्षारोपण करा, पर्यावरणप्रेमींची मागणी

या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्याने कंगनाच्या विरुद्ध हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 154 (अ) , 295 (अ) , 124 (अ), 34 गुन्हा नोंदवण्यात आला होता.या याप्रकरणी समाज पाठवण्यात आले असून कंगनाला सोमवारी तर तिची बहीण रांगोलीला मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Criminal complaint filed against Kangana Ranaut Andheri Court alleged tweets against Mumbai city police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal complaint filed against Kangana Ranaut Andheri Court alleged tweets against Mumbai city police