पोलिसांनी पाठलाग करून सोमय्याला पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

ठाणे - घोडबंदरच्या वाघबीळ भागात रविवारी गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी पाठलाग करून पकडले. किरीट सोमय्या (वय 64) असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एका वाहनातून गावठी दारू नेत असताना किरीट सोमय्या नावाच्या एका वृद्धावर नागला बंदर येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी सोमय्याला गाडी थांबवण्यास सांगितले; मात्र त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याची गाडी अडवली. त्याच्याकडून वाहतूक पोलिसांना गावठी दारूच्या आठ ते 10 ट्यूब हस्तगत केल्या.

Web Title: criminal kirit somaiya arrested crime