भिवंडीत वीज चोरांविरोधात फौजदारी गुन्हे

भिवंडीत वीज चोरांविरोधात फौजदारी गुन्हे

भिवंडी : भिवंडी-कल्याण रोडवरील कोनगाव येथे महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर थेट केबलद्वारे आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याने महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वीच तीन वीजचोरांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केल्याची घटना ताजी असतानाच आणखीन दोघा घरमालकांसह सहा वीजचोरांवर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घरमालक नाहिदामोशा शेख, फरदीन करेल तसेच वीज वापरकर्ते रवीश शेख, नसीम बशीर कुवारी, आबीद शेख, फराज खांडे अशी वीजचोरी प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी माहिरा अपार्टमेंट व मरियम अपार्टमेंटमधील राहत्या घरात महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर केबलद्वारे आकडे टाकून चोरून वीज वापरल्याचे आढळून आले आहे. रवीश याने 958 युनिटचा वापर करून दहा हजार 410 रुपयांची वीज चोरी केली; तर नसीम कुवारी याने 1599 युनिटचा वापर करून 19 हजार 545 रुपयांची वीजचोरी केली. तसेच अबीद याने 1 हजार 105 युनिटचा वापर करून बारा हजार 550 रुपयांची वीजचोरी केली आहे. 

फराज खांडे हे मरियम अपार्टमेंटचे सेक्रेटरी असून त्याने एक हजार 401 युनिट वीज वापर करून सोळा हजार 740 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले. महावितरणचे कल्याण विभागीय कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी या घरमालकांसह सहा वीजचोरांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाबा मुल्ला करीत आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com