संभाजी भिडेंविरुद्ध फौजदारी याचिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

मुंबई - सातत्याने वादग्रस्त विधानांचा आरोप होत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता संजय भालेराव यांनी ऍड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. भिडे यांनी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मनुस्मृतीचा उल्लेख करूनही भिडे यांनी वाद निर्माण केला होता. अशा प्रकारच्या विधानांमुळे जनमानसांमध्ये तेढ, अशांतता निर्माण होत असल्याने कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.
Web Title: The criminal petition against Sambhaji Bhide