लंगड्या घोड्याला सोडून पळालेल्या मालकावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नवी मुंबई - नकोशा झालेल्या घोड्याला सोडून मालक पळून गेल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी महापालिकेच्य पशुवैद्यकीय विभागाने अज्ञात मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सानपाडा येथे झाडाला बांधलेला हा घोडा सापडला आहे. त्याच्या पायाला इजा झाली असून अंगावरही अनेक जखमा झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळले आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच सानपाडा सेक्‍टर- १४ येथे एका घोड्याला अज्ञात इसम सोडून गेल्याची माहिती प्राणिप्रेमीकडून महापालिकेला मिळाली. त्यानुसार पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोड्याची पाहणी केली. तेव्हा काळ्या घोड्याला अज्ञात व्यक्ती उपाशी ठेवून सोडून गेल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन कोंडवाड्यात नेले. तेथे त्याच्या तपासण्या केल्या असता उन्हात पाणी व अन्नाशिवाय त्याला ठेवल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले. या घोड्याच्या अंगावर अनेक जखमा असून त्याच्या टापेलाही गंभीर दुखापत झाली असल्याने घोडा लंगडत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून अज्ञात घोडामालकाचा तपास सुरू आहे. 

नालविक्रीचा धंदा
घोड्याच्या पायाची नाल चौकटीवर लावल्यास वाईट शक्तींचा दुकानात किंवा घरात प्रवेश होत नाही, असे काही जण मानतात. त्यासाठी ते घोड्याची नाल विकत घेतात. याच अंधश्रद्धेतून या घोड्याच्या मालकाने अनेकदा त्याच्या पायात नाल बसवून काढल्याने त्याच्या पायाला जखम होऊन तो अधू झाला असण्याची शक्‍यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Criminal trafficking owner fleeing a lame horse