पेणमध्ये अटक केलेले  दरोडेखोर सराईत गुन्हेगार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

मुंबई  : पेण पोलिसांनी शुक्रवारी पहाटे फिल्मी स्टाईलने पकडलेले दरोडेखोर हे सराईत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर सुमारे 60 ते 70 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

मुंबई  : पेण पोलिसांनी शुक्रवारी पहाटे फिल्मी स्टाईलने पकडलेले दरोडेखोर हे सराईत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर सुमारे 60 ते 70 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

पेण शहरातील कार पळवून शहरात ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पाठलाग पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, हवालदार सदानंद झिराडकर, हवालदार दोरे यांच्या पथकाने केला होता. पोलिस पाठलाग करत आहेत हे समजल्यावर दरोडेखोर पेण- खोपोली रोडवरील आंबेगाव दिशेने पळाले होते; मात्र आंबेगाव येथील पेट्रोलपंपासमोर त्यांच्या गाडीला अपघात झाला.

या वेळी गाडीतून पळून जाणाऱ्या सहा दरोडेखोरांपैकी सुभाष मोहन पवार (42) अनिलसिंग गुलाबसिंग दुधानी या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. चार दरोडेखोर मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी खाक्‍या दाखवताच त्यांनी नांदेड, कल्याण, अंबरनाथ, पुणे ग्रामीण या परिसरात गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली असून सध्या ते जामिनावर सुटून आल्याची माहिती मिळाली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली गाडी, चार कटावणी, दोन चाकू, गॅस कटर, दोन सिलिंडर बाटले, सुरा, लोखंडी पक्कड, पाने तसेच एक कार असा ऐवज सापडला. शटर गॅस कटरने तोडून जबरी लूटमार करण्यात ही टोळी तरबेज आहे. 

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पेण पोलिसांनी अटक केली. त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेतील अन्य फरारी झालेल्या चार आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 
- धनाजी क्षीरसागर, पोलिस निरीक्षक, पेण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminals in a robbery tavern arrested in Pen