राज ठाकरेंच्या बर्थडे केकमधून युती सरकारवर निशाणा

cake
cake

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला. राज यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती.

"लाव रे तो व्हिडीओ"च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप - शिवसेनेविरोधात रान उठवलं होतं. राज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसैनिकांनीही युती विरोधात प्रचार केला होता. आज राज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांतूनही मनसैनिकांनी युती शासनाचा निषेध केला.

मनसेचे पदाधिकारी नयन कदम, दिनेश साळवी यांनी राज यांच्या वाढदिवसानिमित्त ईव्हीएमचा निषेध करणारा केक कापून ईव्हीएम हटवण्याची मागणी केली, तर लोकशाहीचा गळा चिरणाऱ्या लोकशाहीचा निषेध करणारा केक कापून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला.

अशोक चव्हाण यांचं शुभेच्छांचं ट्विट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही आज ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यानाचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीत राज यांनी आघाडीची बाजू घेत शिवसेना-भाजपवर टीका केली होती.शिवाय आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा ही घेतल्या होत्या.येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही मनसेला सोबत घेण्याची काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com