वेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर प्रति ताशी ८० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवल्यामुळे ३० वाहनचालकांवर मार्ग वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी अद्ययावत स्पीडगनच्या माध्यमातून ही कारवाई केल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. यापुढे नियमितपणे मार्गावर दोन ठिकाणी स्पीडगन तैनात केल्या जाणार असल्यामुळे वाहनचालकांना वेगाची मर्यादा पाळावी लागणार आहे.

कळंबोलीहून सुरू होणाऱ्या मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे महामार्गावर वाहतूक नियमांनुसार प्रति तासाला ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आखून दिली आहे; मात्र अतिउत्साहात व इच्छितस्थळी पोहचण्यासाठी अनेकदा वाहन चालकांकडून बेदरकारपणे अतिवेगात वाहने चालण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मार्गावर झालेल्या बहुतांश अपघातांमध्ये अतिवेगाने वाहने चालवण्याचे कारण तपासात पुढे आले आहे. त्यामुळे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी शनिवार (ता. १८) पासून मार्गावर स्पीडगनच्या आधाराने कारवाई सुरू केली आहे.

एक हजाराचा दंड
वाहन चालकाच्या वेगासहित त्याच्या छापील फोटोची पावती स्पीडगनमधून बाहेर येते. अशा वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांच्या गाडीचे क्रमांक घेऊन खालापूर टोलनाक्‍यावर अडवून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.

एक्‍स्प्रेस मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रमुख कारण अतिवेगाने वाहने चालवणे हे आहे. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. रोज एक्‍स्प्रेस वेवर दोन्ही बाजूला स्पीडगन ठेवण्यात येणार आहेत. 
- रूपाली अंबुरे, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस

Web Title: Crossing the speed limit for the Mumbai-Pune Expressway will now cost