बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे "मेट्रो'साठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

जोगेश्‍वरी - बेस्ट कर्मचारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. 9) अनेकांनी रेल्वेप्रमाणे मेट्रोचा पर्याय निवडला. अगोदरच रेल्वेसाठी गर्दी त्यात संपाची भर पडल्याने सकाळी अंधेरी रेल्वे पुलावर मेट्रोसाठी प्रचंड गर्दी व रांग बघायला मिळाली. प्रवाशांनी लोकल, रिक्षा-टॅक्‍सी, एसटी, ओला, उबेर व शेवटी मेट्रोचा पर्याय निवडला होता. 

बेस्ट संपामुळे पश्‍चिम रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. अंधेरीत आज सकाळी अनेक प्रवाशांनी मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते अंधेरी रेल्वे पुलावरील फलाट क्रमांक एकवरील तिकीट बुकिंग खिडकीजवळ दुहेरी रांग मोठ्या प्रमाणात लावली होती. पश्‍चिम रेल्वे व मेटोचे प्रवासी एकत्र आल्याने सकाळी खूप गोंधळ उडाला. अंधेरी रेल्वे पोलिस व आरपीएफचे जवानांनी घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

Web Title: crowd for the metro due to best emploee strike