दगडाने ठेचून तरुणाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - दगडाने ठेचून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 4) बोरिवलीत घडली. विजय सतीश कांबळे (वय 22) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काही संशयितांची पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. विजय हा बोरिवली परिसरात राहत होता. त्याला अमली पदार्थाचे व्यसन होते. मित्रांसोबत तो बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात अमली पदार्थ घेण्याकरिता बसायचा. बोरिवली राष्ट्रीय महामार्गानजीकच्या नाल्याजवळ विजयचा मृतदेह पडल्याची माहिती एकाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पूर्व वैमनस्यातून विजयची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. 

Web Title: Crushed stone murdered young