सहावीतील झेनने वाचवले १३ जणांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - क्रिस्टल टॉवरमध्ये १६ व्या मजल्यावर राहणाऱ्या झेन सदावर्ते या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या जागरूकतेमुळे १३ जणांचे प्राण वाचले. शाळेत शिकलेल्या धड्यातून मिळालेल्या माहितीचा वापर तिने त्यासाठी केला.

मुंबई - क्रिस्टल टॉवरमध्ये १६ व्या मजल्यावर राहणाऱ्या झेन सदावर्ते या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या जागरूकतेमुळे १३ जणांचे प्राण वाचले. शाळेत शिकलेल्या धड्यातून मिळालेल्या माहितीचा वापर तिने त्यासाठी केला.

धुरामुळे हवेतील ऑक्‍सिजन कमी होऊन कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. अशा वेळी गुदमरून एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्‍यता असते; मात्र संबंधित व्यक्तीच्या नाकातोंडावर ओले कापड किंवा कापूस ठेवल्यास श्‍वसनामार्फत कार्बनडाय ऑक्‍साईड शरीरात जात नाही, हा धडा झेनने शाळेत गिरवला होता. त्यानुसार तिने घरातील कपड्याचा तुकडा आणि कापूस ओला करून लोकांना नाकातोंडासमोर धरायला दिला. आगीत भस्मसात होऊ शकेल, असे सामान एका खोलीत आणून ठेवत तिने इतर खोल्यांबाहेर पाणी ओतले. आगीमुळे घरांमध्ये धूर पसरू लागल्याने रहिवाशांनी पळापळ करण्यास सुरुवात केली. अनेकांनी लिफ्टमधून इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखत आग लागल्यास लिफ्ट वापरू नये, असा सल्ला दिला. तो ऐकत ते सर्व जण लिफ्टमध्ये गेले नाहीत. घरात आणि मजल्यावर धूर पसरल्यावर झेनने सर्वप्रथम सगळ्या खिडक्‍या उघडल्या. त्यामुळे धूर बाहेर पडण्यास मदत झाली.

Web Title: Crystal Tower building fire Zen sadavarte saved 13 people alive