CST Bridge Collapse: १२ वर्षांपूर्वीच सांगितलं होतं; तरीही मुंबई पालिका झोपलेलीच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - शहरातील धोकादायक, तसेच जुन्या पुलांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणाऱ्या एन. व्ही. मिराणी यांच्या अध्यक्षतेखालील स्टॅक समितीने २००७ मध्ये या पुलांची नियमित दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. मात्र त्या शिफारशींना प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याने शहरात कोठेही आजच्यासारख्या दुर्घटना वारंवार घडू शकतील, अशी टीका होत आहे.

शहर व उपनगरांतील सुमारे साठ पूल गेल्या सहा वर्षांपूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या मिराणी समितीने या पुलांकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवला होता. जुन्या पुलांची दुरुस्ती पाच वर्षांनी, तर नव्या पुलांची दुरुस्ती दहा वर्षांनी नियमितपणे व्हावी, असेही त्यांनी सुचवले होते. मात्र त्या शिफारशीचेही पालन झाले नसल्याचे जाणकारांनी दाखवून दिले आहे. या पुलांमध्ये छोटे व मोठे उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचाही समावेश होता. 

धोकादायक घोषित केलेल्या पुलांची पालिकेने २०१३ ला तपासणी केली होते. जास्त रहदारी असलेले जुने पूल पाडून त्याजागी नवे पूल बांधण्याचा निर्णयही पालिकेने घेतला होता. मात्र यासंदर्भात नंतर केवळ कागदी घोडे नाचविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. एल्फिन्स्टन रोड पूल, ग्रॅंट रोड पूल, परळ उड्डाणपूल व दादरचा टिळक उड्डाण पूल हे पालिकेने धोकादायक जाहीर केले आहेत.

Web Title: CST Bridge Collapse: Regular repair of bridges was recommended