पावसामुळे बळिराजाचे दिवाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

भिवंडी : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. या निवडणुकीत राजकारण्यांची दिवाळी; तर परतीच्या पावसामुळे बळिराजाचे दिवाळे निघाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून यावर्षीच्या परतीच्या पावसाने ठाण मांडले आहे. रोज सायंकाळी गडगडाटासह पाऊस पडत असल्याने शेतात तयार झालेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेकडो हेक्‍टर भात शेतीत पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भिवंडीत विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या स्वागतासाठी फटाके फुटत असतानाच गुरुवारी सायंकाळी 7.15 वा. गडगडाटासह पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे उरलेसुरले भातपिकही पाण्यात गेले आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cuase of rain farmer in crises