सायकल फिल्म फेस्टिव्हल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - सायकल चालवताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने कॅमेराबद्ध करण्याची संधी पहिल्यावहिल्या "दो पहिया' या सायकल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळणार आहे. हा फेस्टिव्हल रविवारी (ता. 27) वर्सोवा येथील दी लिटल हाऊस येथे होईल.

दोन ते तीन मोठ्या फिल्मबरोबरच सायकलस्वारांनी बनवलेल्या फिल्मही या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहेत. तुम्ही एखादी सायकल फिल्म व्हिडीओ कॅमेऱ्याने शूट केली असेल आणि शहर, महानगर, निमशहर, ग्रामीण भाग, डोंगर-दऱ्या, देश-विदेश कुठेही तुम्ही सायकलवरून भटकंती केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल, तर ते संपादीत करा. त्याची फिल्म बनवा (3 ते 5 मिनिटे) आणि dopahiyafilmfestival@gmail.com वर पाठवा.

Web Title: cycle film festival