कोळी समाज उपेक्षितच ! चक्रीवादळात 25 कोटींचे नुकसान, पण सरकारचे मात्र दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मासळी मिळण्याच्या हंगामातच लॉकडाऊन सुरू झाल्याने मासेमारीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे दोन ते अडीच महिने हजारो बोटी किनारी लावल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली.

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगड जिल्ह्यातील कोळी समाजाचे 25 कोटी रुपयांचे  नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून भरपाई न मिळाल्याने कोळी समाज उपेक्षितच राहिला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाची बातमी वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

मासळी मिळण्याच्या हंगामातच लॉकडाऊन सुरू झाल्याने मासेमारीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे दोन ते अडीच महिने हजारो बोटी किनारी लावल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली. त्यात अलिबाग, मांडवा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा या भागांसह अनेक ठिकाणी चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले. घरांची पत्रे उडण्याबरोबरच बोटीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेली ताडपत्रीही उडून गेली. मासळीचे जाळे तुटून गेले. किनारी असलेल्या बोटींचे नुकसान झाले. असे सुमारे 25 कोटी रुपयांची वित्तहानी जिल्ह्यातील कोळी समाजाची झाली आहे. 

नक्की वाचाठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

तलाठी, ग्रामसेवकांमार्फत नुकसानीची पंचनामे करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, नुकसान होऊन एक महिना होत आला, तरी कोळी समाजासह मच्छीमारांपर्यंत कोणतीही भरपाई पोहचली नसल्याची खंत शेषनाथ कोळी यांनी व्यक्त केली. कोळी समाजाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्ती केली.

cyclone caused a loss of Rs 25 crore, but the government ignored it


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyclone caused a loss of Rs 25 crore, but the government ignored it