वादळाचा धोका, मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज
वादळाचा धोका, मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट

मुंबई: अरबी समुद्रात (Arbian sea) कमी दाबाचा पट्टा वेगाने तयार होत आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात किनारपट्टीला चक्रीवादळ (Cyclone) धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई (Mumbai) आणि ठाण्यासाठी (thane) यलो अलर्ट जारी केला आहे. सोसाट्यांच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या चक्रिवादळामुळे रविवारी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सर्व किनाऱ्यांवर 96 जीव रक्षक तैनात ठेवण्यात येणार असून राष्ट्रीय आपत्ती निवारण बलही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर कोविड जंम्बो कोविड केंद्रांच्या परीसरातही आवश्‍यक उपाय योजना करण्यात येत असल्याचे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले. कोविड केंद्रांची स्थैर्यता तपासण्यात येत आहे. (Cyclone threat mumbai & thane yellow alert)

शनिवार पर्यंत कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रुपांतर होणार आहे. रविवारी मुंबईत 24 तासात 1115 मि.मी पर्यंत पावसाचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्यास अग्निशमन दलाचे बचव पथकही आठ केंद्रावर सज्ज ठेवण्यात आले आहे. या केंद्रावर पुर बचाव पथकासह आवश्यक यंत्र सामुग्री तैनात आहेत तर,सर्व किनाऱ्यांवर 96 जिवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यांना जेटस्की, बोटी,दुर्बिण तसेच तीव्र प्रकाश झोताच्या टॉर्चही देण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मैदानात उभारण्यात आलेल्या कोविड केंद्रांची स्थैर्यंत पडताळण्यात येत आहे तसेच,केंद्राच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फाद्याही छाटण्यात आल्या आहेत. विज पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वादळाचा धोका, मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट
मुंबईला प्राधान्य, पुण्याबरोबर भेदभाव, भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

प्राणवायूच्या टाक्याही सुरक्षित

जंम्बो कोविड केंद्रांच्या परीसरात प्राणवायूच्या महाकाय टाक्या आहेत. वादळी वाऱ्यांपासून या टाक्यांना धोका होऊ नये म्हणून तपासणी करण्यात येत आहे. तसेच,त्या परीसरातील झाडांची छाटणीही करण्यात येत आहे.

वेळ पडल्यास रुग्ण हलविण्याची तयारी

जंम्बो कोविड केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना संबंधीत प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत.गरज पडल्यास केंद्रातील रुग्ण हलविण्याची तयारीही महापालिकेने केली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात ‘ऑरेंज’ अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून वादळाची तीव्रता शनिवारी वाढणार आहे; चक्रीवादळ कोकण किनार्‍याला शुक्रवारी धडकण्याची चिन्हे सायंकाळपासून दिसू लागली आहेत. समुद्रात हलक्या लाटा उसळत आहेत. पाण्यालाही करंट आहे. रत्नागिरीत सायंकाळी वार्‍याचा वेगही वाढल्याने मच्छीमार बंदरांवर परतले, अशी माहिती मच्छीमारांनी दिली.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. कुलाबा येथील प्रादेशिक वेधशाळेतर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अति मुसळधार पाऊस दोन्ही जिल्ह्यात पडू शकतो. हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानंतर मच्छीमारांनाही त्याचे संकेत मिळू लागले आहेत. चक्रीवादळ रविवारी (ता. 16) धडकण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com