दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा सदिच्छादूत हरपला : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई : ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुंबई : ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Saddened to know about the demise of Pujaniya Dada J.P. Vaswani ji, a guide, philosopher to many.
Not only in India, but he inspired and mentored millions of lives across the globe with his teachings.
Hundreds of books written by him will continue to guide us! pic.twitter.com/jZnVqnEKl3

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 12, 2018

साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी (वय 99)  यांचे आज (गुरुवार) सकाळी पुण्यात निधन झाले. सिंधी समाजाचे धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख होती.  ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले, "दादा वासवानी यांच्याशी माझा निकटचा ऋणानुबंध होता. त्यांच्याशी अनेकदा झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो. विशेषतः मानवतावादावरील त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांनी केलेले संबोधन भारतीय तत्त्वज्ञानाची महत्ता दर्शविणारे होते. जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदानुसार साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य मोलाचे असून अध्यात्मावरील त्यांची पुस्तके नव्या पिढीसाठी सदैव मार्गदर्शकाची भूमिका बजावतील. त्यांच्या निधनाने देशाने एक थोर सुपूत्र गमावला आहे."

Got an opportunity to meet, interact and take blessings from this great humanitarian many times.
His work for animal rights shows his sensitivity towards ‘life’ !
My tributes to Him & deepest condolences to millions of followers and entire team of Sadhu Vaswani Mission.

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 12, 2018

साधू वासवानी यांचे अंत्यदर्शन दर्शन आज दुपारी बारापासुन मिशन येथे सुरु आहे. उद्या ता.13 जुलै  मिशन येथे दुपारी 2 वाजता अंतिम यात्रा पार पडणार आहे. ता. 14 जुलै दुपारी 5 वाजता साधू वासवानी मिशन परिसरात अंतिम संस्कार विधी पार पडणार आहे.

Web Title: Dada Vaswani's death is loss humanity: CM