दादर चैत्यभूमी आता 'अ' वर्ग  पर्यटनस्थळ

अमित गोळवलकर 
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई- दादरच्या चौपाटीवरील चैत्यभूमीला वेगळेच स्थान आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणजे ही चैत्यभूमी. या चैत्यभूमीला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा आणि 'अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. ही मागणी शासनाने मान्य केली असून यापुढे चैत्यभूमी ही 'अ'वर्ग पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जाईल. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर दादर  येथे समुद्र किनार्‍यावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला. त्यामुळे या परिसराला 'चैत्यभूमी' असे म्हणतात. एकीकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरी कडे दादरची चैत्यभूमी असे हे स्थळ आहे. दर वर्षी 6 डिसेंबर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाला आणि 14 एप्रिल या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चैत्यभूमी कडे लाखोंच्या संख्येने भारताच्या काना-कोपर्‍यातून अनुयायी येत असतात. दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोक चैत्यभूमीला भेट देतात. 
अशा या स्थळाला 'अ' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनीही चैत्यभूमीला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज आदेश काढून चैत्यभूमी हे 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. 

चैत्यभूमीप्रमाणेच नागपूरची दीक्षाभूमी हे बुद्ध धर्माचे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे.  सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो दलितांना आमंत्रित करून याच जागेवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दीक्षाभूमीला शासनाने याच वर्षी मार्च महिन्यात 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर आता चैत्यभूमीची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: dadar chaityabhumi now A class tourist place