डबेवाल्यांनी भागवली गरिबांची भूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

दादर - पार्टी-लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी डबेवाल्यांनी सुरू केलेल्या रोटी बॅंकने ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त गरिबांची भूक भागवली. विविध हॉटेल व नागरिकांकडून डबेवाल्यांना ३१ डिसेंबरच्या रात्री उरलेले अन्न नेण्यासाठी १०० पेक्षा जास्त दूरध्वनी आल्याची माहिती डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली. 

नवीन वर्षाचे सगळीकडे जोरदार स्वागत सुरू असताना मुंबईचे डबेवाले गरिबांची भूक भागवण्यात व्यस्त होते. ३१ डिसेंबरच्या रात्री विविध ठिकाणी पार्ट्या असतात. त्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहते. ते बऱ्याचदा कचऱ्याच्या डब्यात टाकून देण्यात येते; पण काही दिवसांपूर्वी मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘रोटी बॅंक’ला ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Web Title: dadar mumbai news dabewale poor hungry Appetite

टॅग्स