पोशिंद्यांवरच कामासाठी हात पसरण्याची वेळ

डहाणू ः पावसामुळे पीक वाया गेले आहे.
डहाणू ः पावसामुळे पीक वाया गेले आहे.

डहाणू ः पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणूत रोजगाराचा प्रश्‍न गंभीर असल्याने येथील अर्थव्यवस्था कोलमडून पडू लागली आहे. यंदा झालेल्या परतीच्या, अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदार, मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांसह मच्छीमारांवर काम शोधण्याची वेळ आली असून कुणी काम देता का काम, अशी आर्त साद ते घालत आहेत.

डहाणूची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी येथील चिकू उत्पादन महत्त्वाचा उद्योग आहे. चिकू व्यवसायात झाडावरील चिकू काढण्यापासून ते चिकू झाडांची मशागत, चिकू स्वच्छ करणे, पॅकिंग करणे, त्यांना खतपाणी देणे, वाहतूक, हमाली करणे, यावरदेखील आदिवासींची हजारो कुटुंबे अवलंबून आहेत; मात्र यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांचे हातचे काम गेल्याने आर्थिक स्थिती बिघडली आहे.

यंदा लांबलेला पावसाळा, परतीचा, अवकाळी पाऊस आणि क्‍यार चक्रीवादळाच्या प्रभावाने गेल्या महिनाभरापासून मच्छीमारी ठप्प आहे. मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
अशोक अंभिरे, ज्येष्ठ मच्छीमार नेते, अध्यक्ष, गुंगवाडा मच्छीमार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

डहाणू परिसरात वर्षाकाठी हजारो टन चिकू उत्पादित होत असून, त्यावर हजारो मजूर वर्ग पोसला जात आहे. . यंदा चिकूवर बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन ठप्प झाले असून आर्थिक व्यवस्था कोलमडून पडली आहे.
नौशीर इराणी, चिकू उत्पादक, बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com