डहाणू : ओबीसींच्या जागेवर दिला आदिवासी उमेदवार; शिवसेनेत होणार बंडखोरी

Elections
Electionssakal media

विरार : न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरून (obc reservation) पालघर जिल्हा परिषद (palghar ZP) आणि पंच्यायत समितीच्या सदस्याचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर रद्द झालेल्या जागांवर ५ ऑक्टोबरला निवडणूक (election) होत असून सर्वच पक्षांनी यासाठी कम्बर कसली आहे. या निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर ओबीसींचा उमेदवार देण्याचे साऱ्याच पक्षांनी जाहीर केले असताना डहाणू (dahanu) मध्ये मात्र शिवसेनेने खासदार राजेंद्र गावित (rajendra gavit) यांच्या मुलाला उमेदवारी देऊन ओबीसींना लांब ठेवल्याने या ठिकाणी सेनेत बंडखोरी (shivsena) होणार असल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत असून सेनेच्या नितेश चुरी (nitesh churi) यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अकहे.

Elections
राष्ट्राच्या स्वाभिमानाला इजा पोहोचेल अशी टीका नको - गौतम अदाणी

न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जगासाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत साऱ्याच पक्षांनी ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्याचे जाहीर केले असताना राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मात्र खासदाराच्या मुलांसाठी ओबीसींच्या उमेदवारीला डावलल्याचे चित्र डहाणू मध्ये दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या वणई गटातून शिवसेनेचे विद्दमान सदस्य सुशील चुरी यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारली असून,खासदार राजेन्द्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे वणई गटातुन नितेश किशोर चुरी यांनी अपक्ष म्हणून उमेरवारी अर्ज भरला असल्याने शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

अगोदरच पालघर मध्ये आदिवासी साठी मोठ्या प्रमाणत आरक्षण असताना पुन्हा एकदा ओबीसींच्या जागेवर आदिवासी उमेदवार देऊन शिवसेना येथील शिवसैनिकांचे मनोधर्य खची करत आहे असा आरोप आता सेनेतूनच होऊ लागला आहे. मुळात राजेंद्र गावित हे ज्यावेळी पालघर मध्ये आले तेव्हा त्यांनाही उपरा ठरविले होते. परंतु त्यानंतरही ते प्रथम काँग्रेस, नंतर भाजप आणि आता शिवसेनेतून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला हि याठिकाणी येथील लोक सामावून घेतील असे सांगण्यात येते. गावित यांच्या मुलाकडे भावी खासदारकीचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्याला आता पासूनच राजकारणात उतरविण्याची योजना शिवसेनेने आखल्याचे बोलले जात आहे. आता ज्यांनी डहाणूत शिवसेना उभी केली ते शिवसैनिक निवडणुकीत काय करतात यावर निवडणुकीत हार जीत चा फेसला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com