दहीहंडी उत्सव म्हणजे आपत्ती का? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - विमा कवच मिळणार म्हणून गोविंदा पथक समाधान व्यक्त करीत आहेत. आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढणे गरजेचे असते. मग दहीहंडी उत्सव म्हणजे आपत्ती आहे का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या आणि याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी केला. उत्सवामध्ये थरांची जीवघेणी स्पर्धा कशाला, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

दहीहंडीच्या उंचीवर उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या स्वाती पाटील यांनी सोशल मीडियावर दहीहंडी उत्सवाबाबत व्हिडीओ व्हायरल केला. त्यामध्ये असे प्रश्‍न त्यांनी गोविंदापथकांना आणि सरकारला विचारले आहेत. गोविंदाच्या सुरक्षेबाबत सरकारला आणि आयोजकांना काहीच घेणे-देणे नाही, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. थरांवर थर रचून त्याला आपण आपत्तीचे रूप देतो. असे करू नका. उत्सव आनंदाने सुरक्षित साजरा करा. त्यासाठी गोविंदांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असेही पाटील म्हणाल्या.

Web Title: Dahihandi festival Insurance