थरावरून पडल्याने गोविंदाचा मृत्यू

Dahihandi
Dahihandi

मुंबई - दहीहंडीच्या उत्सवात न्यायालयाचे आदेश डावलून सुरक्षा नियमांना हरताळ फासल्याने सुरक्षेची हंडी रिकामीच राहिली. त्यामुळे अनेक ठिकाणी उत्साहाला गालबोट लागून 86 गोविंदा जखमी झाले; तर धारावी येथे कुश खंदारे (वय 20) या गोविंदाचा आकडी येऊन थरावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. 37 जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसली, तरी 14 वर्षांखालील मुलांना मनाई करण्यात आली होती; तसेच शेवटच्या थरावरील गोविंदाला सुरक्षा दोर लावणे बंधनकारक होते. या नियमांची हंडी आयोजकांनी फोडली आहे. अनेक गोविंदा पथकांनी 14 वर्षांखालील लहान मुलांना वरच्या थरावर चढवले होते. कुलाबा येथे हंडी फोडताना एक नऊ वर्षांचा मुलगा जखमी झाला. अनेक जणांनी प्रत्यक्ष हंडी फोडण्याऐवजी सलामी देऊन बक्षिसे मिळवली. मुंबईत लहान-मोठ्या दीड ते दोन हजार हंड्या होत्या. चौथ्या थराला दीड हजार, पाच थराला दोन हजार अशी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com