अलिबागमध्ये शेकापची लाखाची दहीहंडी 

संग्रहित
संग्रहित


अलिबाग : दहीहंडी उत्सवासाठी अवघे तीन दिवस उरले असून, शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी उभारली जाणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अलिबागचा आपला उत्सव या भूमिकेतून दहीहंडी सोहळा गोपाळकालाच्या दिवशी शनिवारी (ता. 24) शेतकरी भवन येथे दुपारी 4 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी एक लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी उभारण्यात येईल.

दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रोख स्वरूपात बक्षिसासह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सलामीला दहीहंडी उभारणाऱ्या पुरुष व महिला पथकाला थरानुसार बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यात पाच थराच्या पुरुष पथक 11 हजार 111 रुपये, चार थराच्या महिला पथकाला 11 हजार 111 रुपये देऊन गौरविले जाणार आहे.

या उत्सवामध्ये पूरग्रस्तांना मदतही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोहळ्यामध्ये चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले आहे. आकर्षक चित्ररथ असणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 10 हजार रुपये व द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये व तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये असे बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com