दहीहंडीच्या परवानग्या सुलभतेने द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. गोविंदा मंडळे व आयोजकांना सुलभपणे परवानग्या द्या, असे निर्देश क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.

मुंबई - दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. गोविंदा मंडळे व आयोजकांना सुलभपणे परवानग्या द्या, असे निर्देश क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.

दहीहंडी उत्सवाबाबत सोमवारी (ता. २९) मंत्रालयात क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांचा १० लाखांपर्यंत विमा उतरवण्यात यावा, ध्वनिप्रदूषण रोखा, गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, मॅट यांचा वापर करा, उत्सवस्थळी रुग्णवाहिकांची व्यवस्था करा आदी अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचे पालन करून आयोजक आणि गोविंदा पथकांना सुलभपणे परवानग्या द्याव्या, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने या बैठकीत मांडली. 

क्रीडामंत्री शेलार यांनी या भूमिकेचे स्वागत केले आणि सरकारी विभागांनी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश दिले. गोविंदा पथकांचा विमा, वाहतूक नियंत्रण याबाबतही पोलिसांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला विशेष महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था) मनोजकुमार चौबे, सांस्कृतिक कार्य प्रसंचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi Permission Ashish Shelar