मनसैनिक व भीमसैनिक आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

दहिसर - फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आता आरपीआयचे भीमसैनिक फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मनसेच्या आंदोलनाविरोधात दहिसरमध्ये बुधवारी (ता. 25) आरपीआयतर्फे जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आवाज उठविताच मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करीत त्यांना मारहाण केली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी आता आरपीआयचे भीमसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत.
दहिसरमधील मनसे विभागप्रमुख राजेश येरुणकर यांनी कार्यकर्त्यांसोबत सोमवारी (ता. 23) सायंकाळी रेल्वेस्थानक परिसरात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मनसे कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत आरपीआयचे दहिसर तालुकाध्यक्ष दिलीप व्हावळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 25) सायंकाळी फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी दहिसर रेल्वेस्थानकाजवळील आंबेडकर चौकात जाहीर सभा घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी भीमसैनिक उतरतील, असा इशारा राज ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार आम्ही सज्ज असल्याचे व्हावळे यांनी सांगितले. या वादामुळे राजकीय नाट्य चांगलेच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: dahisar mumbai news mns & rpi disturbance