उल्हासनगरात दलित मुलांची धिंड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

उल्हासनगर - पुण्यात छेड काढल्याच्या संशयावरून दोन मुलांची नग्न धिंड काढल्याचा प्रकार घडला असतानाच, उल्हासनगरातही चकली चोरल्यावरून दोन लहान दलित मुलांना दुकानदारांनी अर्धनग्न करून अर्धे टक्कल केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

उल्हासनगर येथील कॅम्प नंबर 5 मध्ये शनिवारी सकाळी दोन मुले घराबाहेर खेळत होती; मात्र जवळच असलेल्या किराणा दुकानातून त्यांनी दुकानदाराच्या नकळत चकली घेतली. दुकानमालक दोघे भाऊ इरफान आणि तबकल पठाण यांनी दोघांना पकडले. त्यानंतर त्यांनी अर्धे केस कापून गळ्यात चपलांचा हार घातला. त्यानंतर या मुलांची परिसरातून अर्धनग्न धिंड काढण्यात आली. दुकानदार इरफान या मुलांना मारहाण करीत होता. त्या वेळी त्याचा भाऊ तबकल पठाण हा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करीत होता. मोबाईलमध्ये रेकार्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये पसरवून व्हायरल केला. भारिप-बहुजन महासंघाचे युवक अध्यक्ष ऍड. जय गायकवाड यांनी हा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांच्या पालकांसह पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना हा प्रकार सांगून व्हिडिओ दाखवला. त्यानंतर याप्रकरणी मेहमूद पठाण (वय 70), इरफान पठाण, तबलक पठाण यांच्यावर ऍट्रॉसिटी व पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Dalit children's Dhind in Ulhasnagar