Dalit Panther anniversary : दलित पँथर वर्धापन दिनानिमित्त चैत्यभूमीवर विचारवंतांची मांदियाळी

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पँथर पुरस्काराने होणार सन्मान
 Dalit Panther anniversary Panther leadership Award
Dalit Panther anniversary Panther leadership Awardsakal

मुंबई : दलित पँथर वर्धापन दिनाच्यानिमित्त दलित युथ पँथर या संघटनेच्यातीने चैत्यभूमीवर सोमवारी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील विचारवंतांची उपस्थिती राहणार असून, त्यांना पँथर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

शिवाय लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत शाहीर संदेश विठ्ठल उमप, शाहीर कडूबाई खरात, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, विनोद विद्याधर, अश्विनी निरभवने यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सुद्धा होणार आहे.

 Dalit Panther anniversary Panther leadership Award
Mumbai Crime News: धक्कादायक! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार अन्...

यावर्षी विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ विधितज्ञ राहुल मखरे आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना राज्यव्यापी पँथर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, दलित पँथर संस्थापक साहित्यिक ज.वी.पवार, साहित्यिक व रिपब्लिकननेते अर्जुन डांगळे यांचा हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 Dalit Panther anniversary Panther leadership Award
Mumbai : नेहमीप्रमाणे श्वानाला अंघोळ घालण्यास गेले, तलावातील पाण्यात पाय घसरला; बहिण भावाचा बुडून मृत्यु

यावेळी जेष्ठ पत्रकार मधू कांबळे, विचारवंत सुबोध मोरे, ओबीसीनेते राजाराम पाटील, साहित्यिक बबन सरवदे, साहित्यिक श्रावण देवरे, पँथर सयाजी वाघमारे, माजी पोलीस अधिकारी एड.विश्वास काश्यप, पत्रकार दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे दलित युथ पँथरचे अध्यक्ष नीलेश मोहिते यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com