दलित वस्त्यांमधील कामे करा - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

ठाणे -  शहरांमधील दलित वस्त्यांमधील सुधारणांची कामे वेगाने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. 28) जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित केली होती. जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांत कामे सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने बैठकीत दिली. 2015-16 साठी दलित वस्त्यांमधील कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्याचे वाटपही केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

ठाणे महापालिका सात कोटी, मिरा-भाईंदर पाच कोटी, कल्याण-डोंबिवली पाच कोटी 33 लाख, उल्हासनगर पाच कोटी, भिवंडी पाच कोटी, अंबरनाथ पाच कोटी, कुळगाव-बदलापूर सहा कोटी 65 लाख, मुरबाड तीन कोटी 12 लाख, शहापूर दोन कोटी 86 लाख इतका निधी दिला आहे. मुरबाड, शहापूर आणि विशेषत: भिवंडीतील कामे अधिक गतीने करावी, असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. मुरबाड, शहापूर नगरपंचायतींना जादा निधी देण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 2016-17 साठी महापालिका क्षेत्रांत 21 कोटी; तर नगरपालिका क्षेत्रात 10 कोटी जिल्हास्तरीय समितीने मंजूर केले. आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, मुख्याधिकारी व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Web Title: Dalit slums works