मोखाड्यात परतीच्या पावसाने ऊडवली दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

विजेच्या तारा आणि झाडे रस्त्यावर ऊन्मळून टाकली आहे. त्यामुळे येथील आदिवासींची मोठी वित्त हानी झाली असून विज पुरवठा ही खंडीत झाला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. 

मोखाडा - मोखाड्यात गेली तीन दिवसांपासून रोज संध्याकाळी शेतीस ऊपयुक्त नसलेला परतीचा पाऊस वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घालत आहे. बुधवारी 3 ऑक्टोबर ला या वादळी पावसाने मोखाड्यातील वाकडपाडा येथील समाज मंदिरासह इतर घरांचे छप्परे ऊडवली आहेत. तसेच विजेच्या तारा आणि झाडे रस्त्यावर ऊन्मळून टाकली आहे. त्यामुळे येथील आदिवासींची मोठी वित्त हानी झाली असून विज पुरवठा ही खंडीत झाला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. 

मोखाड्यात एक महिण्याच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान च्या काळात खरीप हंगामाची शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात पाऊस पडला असता तर, बंधा रूपया पिक हाती आले असते. मात्र, महिणाभराच्या विश्रांती नंतर गेली तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मोखाड्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिक ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

बुधवारी 3 ऑक्टोबर ला झालेल्या परतीच्या वादळी पावसाने, मोखाड्यातील वाकडपाडा येथील समाज मंदिरासह सुमारे 15 घरांचे छप्पर ऊडवली आहेत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे ऊन्मळून टाकली आहेत, तर विजेच्या ताराही तुटल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत, मोखाड्यात दाणादाण ऊडवली आहे. सर्व नुकसान ग्रस्त आदिवासींच्या घरांचे पंचनामे करून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
 

Web Title: Damaged in mokhada because of the returning monsoon