डान्स बारमधील पैशांचा पाऊस आटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

टीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला आणि वेटर घरी

मुंबई - चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्याचा फटका मुंबईतील डान्स बारनाही बसला आहे. चार दिवसांपासून डान्स बारमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बारबाला आणि नोकरांना टीप मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत बाजारात सुट्टे पैसे मिळाले नाहीत तर बारमधील सर्वांना घरी राहण्यास सांगितले जाणार आहे. टीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला घरातून बाहेरच पडलेल्या नाहीत.

नागरिकांना पैशासाठी तासन्‌तास बॅंकेबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. खात्यात पैसे आहेत; पण खिसे रिकामे, अशी अवस्था असल्याने अनेकांनी मनोरंजनावर काट मारली आहे. परिणामी पैशाच्या पावसाची बरसात होणारे डान्स बार ओस पडले आहेत. शहरात एकूण २५० डान्स बार आहेत. पैसे नसल्याने सध्या तिथे दिवसाला अवघे दोन-तीन ग्राहक येत आहेत. ग्राहक घटल्यामुळे बारबालांना फारशी टीप मिळत नसल्याने पदरचे पैसे खर्च करून त्या बारमध्ये येत आहेत. टीप मिळत नसेल तर खायचे काय, अशी चिंता त्यांना लागली आहे. परिणामी ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबालांनी घरीच राहणे पसंद केल्याचे ‘आहार’चे (परफॉर्मन्स बार) अध्यक्ष भारत ठाकूर यांनी सांगितले. बारमध्ये सुट्या पैशांवरून अडचण येत आहे. वेटरलाही टीप मिळत नसल्याने ते हवालदिल झालेत. 

हाजीअली दर्ग्याबाहेरील भिकाऱ्यांना झळ
हाजीअली दर्ग्याबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना नोटांच्या टंचाईची झळ बसली आहे. अंबरनाथहून रोज हाजीअली दर्ग्यात येणारे हुसेन पप्पूवाले यांच्यासह चौघे जण दिवसाला पाचशे-सातशे रुपये कमावतात. मात्र, चार दिवसांपासून त्यांना दिवसाला अवघे ८० ते ९० रुपये मिळत आहेत. अब्दुल हुसेनला दिवसाला ३५०-४०० रुपये मिळायचे; पण दोन दिवसांपासून ५० रुपयांपेक्षा जास्त मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Web Title: dance bar money shortage