डान्स बार परवान्याचे 80 टक्के अर्ज फेटाळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्स बारच्या परवान्यासाठी करण्यात आलेले 80 टक्के अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील 60 टक्के अर्जांत लिहिलेल्या बारच्या संभाव्य जागांची पाहणी पोलिसांमार्फत करण्यात आली. त्यात त्या योग्य नसल्याचे आढळले. अर्ज करण्यात आलेल्या बारनी 26 अटी पूर्ण करणे आवश्‍यक असते. सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवल्यानंतरही त्याविरोधात भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका देत बारमालकांना परवाना देण्यास सांगितले होते. आता 14 ते 15 अर्ज बाकी असून, त्यांचीही पडताळणी करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
Web Title: dance bar permission 80% form reject