CST Bridge Collapse: धोकादायक पूल 186; 'तत्पर' महापालिका करतेय 50 पुलांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते.

मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण सुरू केले होते. महापालिकेच्या २९६ पुलांपैकी १८ पूल बंद करून नवे पूल बांधण्याची गरज असल्याचे सर्वेक्षणात आढळले होते. त्यांच्यात १० वाहतुकीचे आणि आठ पादचारी पूल होते. हा अहवाल गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला महापालिकेने परवानगी दिली आहे. महापालिका या पुलांच्या दुरुस्तीसाठी ७३ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यात दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वेवरील पुलांचाही समावेश आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल (मरिन लाईन्स), विद्याभवन पादचारी पूल (गिरगाव चौपाटी), केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल (ग्रॅंट रोड), केनेडी रेल्वे ओव्हरब्रिज (ग्रॅंट रोड), बेलासिस रेल्वे ओव्हरब्रिज (मुंबई सेंट्रल), रे रोड (रेल्वे ओव्हरब्रिज), जुहू-तारा मार्ग एसएनडीटीजवळील पूल, धोबीघाट मजास नाला पूल, लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स (अंधेरी पश्‍चिम), कामत क्‍लबजवळील पूल यांच्या दुरुस्तीसाठी ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

दादर, माहीम परिसरातील सात पुलांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कुर्ला-गोवंडी, चेंबूर, मानखुर्द परिसरातील १८ पुलांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी १८ लाखांचा खर्च केला जाईल. वांद्रे ते जोगेश्‍वरी परिसरातील पुलांसह वांद्रे येथील स्कायवॉकचीही दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.  

‘सकाळ’ने व्यक्त केली होती भीती 
अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर ‘सकाळ’ने ८ जुलै २०१८ रोजी रेल्वेच्या पुलांवरील प्रवाशांच्या जीवघेण्या प्रवासाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वारंवार ‘सकाळ’ने या समस्येचा पाठपुरावा करून उणिवा यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत.

जखमींवर उपचार सुरू
सेंट जॉर्जेस रुग्णालयात २२ जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक, तसेच इतरांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. मृत झालेल्या पाच जणांचे मृतदेहही येथे ठेवण्यात आले आहेत. तसेच गर्दीमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयाचा परिसर शोकाकुल झाला होता. मंत्री गिरीष महाजन, खासदार अरविंद सावंत, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी जखमींची विचारपूस केली.

जखमींची यादी 
१) सोनाली नवले (३०)
२) अद्वेत नवले (३)
३) राजेंद्र नवले (३३)
४) राजेश लोखंडे (३९)
५) तुकाराम एडगे (३१)
६) जयेश अवलानी (४६)
७) महेश शेरी 
८) अजय पंडित (३१)
९) हर्षदा वघाडे (३५)
१०) विजय भागवत (४२)
११) नीलेश पाटवकर
१२) परशुराम पवार
१३) मुबालिक जैस्वास
१४) मोहन मोझादा (४३)
१५) अनोळखी (३२)
१६) आयुषी राणका (३०)
१७) सिराज खान (५५)
१८) राम कुपरेजा (५९)
१९) राजे दास (२३)
२०) सुनील गिरलोटकर (३९)
२१) अनिकेत जाधव (१९)
२२) अभिजीत माना (२१)
२३) राजकुमार चावला (४९)
२४) सुभाष बॅनर्जी (३७)
२५) रवी राजेशेट्टी (४०)
२६) नंदा कदम (५६)
२७) राकेश मिश्रा (४०)
२८) अत्तार खान (४५)
२९) सुजय माझी (२८)
३०) खानुभाई सोलंखी (४७)
३१) दीपक पारेख

Web Title: Dangerous pool 186 Repair of 50 bridges done by ready municipal corporation