खारघरमधील स्पॅगेटी सोसायटीला धोका

खारघरमधील स्पॅगेटी हौसिंग कॉम्प्लेक्‍सच्या पिलरला तडे गेले आहेत.
खारघरमधील स्पॅगेटी हौसिंग कॉम्प्लेक्‍सच्या पिलरला तडे गेले आहेत.

खारघर : सिडकोने उभारलेल्या खारघरमधील स्पॅगेटी हौसिंग कॉम्प्लेक्‍सच्या पिलरला तडे गेले आहेत. तसेच एका इमारतीमधील सदनिकेचा बाहेरील सज्जाचा काही भाग कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सिडकोने 2003 मध्ये खारघर, सेक्‍टर 15 मधील स्पॅगेटी वसाहतीची जाहिरात करताना वसाहतीमध्ये अत्याधुनिक मायवान तंत्रज्ञानाचा वापर केलेले बांधकाम, प्रत्येक घरात दूरध्वनी, दूरचित्रवाणी जोडणी, तरण तलाव, क्‍लब हाऊस, शापिंग सेंटर अशा स्वरूपाची जाहिरात केली. त्यामुळे अनेकांनी घरांची नोंदणी केली.

या वसाहतीमध्ये प्रियदर्शनी, प्राईमरोज, पारिजात आणि स्पॅगेटी अशा चार सोसायट्यांमध्ये एकूण 1 हजार 456 घरे आहेत. येथे एकूण 18 बिल्डिंग आहेत. यात जे, के, एल, एम अशा 4 विंगमध्ये 456 सदनिकाधारक राहतात.

या चार विंगच्या इमारतीमधील सुमारे 12 पिलरला तडे गेले आहेत; तर एका इमारतीच्या सदनिकेच्या बाहेरील खिडकीचा सज्जा रविवारी तुटून पडला. 2012 मध्ये दोन पिल्लरला तडे गेल्याचे सोसायटीमधील नागरिकांच्या निदर्शनास येताच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोला पत्र देऊन उपाययोजना केली नसल्याचे सांगितले. 

तडे गेलेल्या स्पॅगेटी वसाहतीला सिडकोचे संबंधित अधिकारी भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर पुढील योग्य ती उपाययोजना केली जाईल. 
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.

इमारतीला तडे गेल्यावर निदर्शनास येताच सिडकोला स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात यावे, असे पत्र दिले आहे. सिडकोने दुर्लक्ष केल्यास दुर्घटना घडू शकते. सिडकोने वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. 
- यशवंत देशपांडे, सचिव, जेकेएलएम स्पॅगेटी सोसायटी 

स्पॅगेटी वसाहतीमधील जे, के, एल, एम सोसायट्यांच्या काही पिलरना तडे गेल्याची माहिती मिळाली. उदया प्रियदर्शनी सोसायटीतदेखील असा प्रकार घडू शकतो. सिडकोने स्पॅगेटीमधील सर्व सोसायट्यांची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी. 
- गणेश बनकर, रहिवासी, प्रियदर्शनी सोसायटी, स्पॅगेटी वसाहत  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com