शहापुरातील दापूर ग्रामस्थांचे मतदान बहिष्कारास्त्र म्यान 

शहापूर : मतदान केंद्रावर ग्रामस्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना अधिकारी.
शहापूर : मतदान केंद्रावर ग्रामस्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना अधिकारी.

शहापूर : शहापूर तालुक्‍यातील दुर्गम भागातील दापूर गावात पिण्याचे पाणी, रस्ता यांसारख्या मूलभूत गरजांची कायम वानवा असते. ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून शून्य टक्के मतदान केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकत तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची भेट घेत यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मोठ्या प्रमाणात मतदान केले. दुपारी तीन वाजेपर्यंत 245 पैकी 165 अशी मतदानाची नोंद या ठिकाणी झाली. दरम्यान, मतदानावरील बहिष्कार मागे घेतल्याने ग्रामस्थांचे मतदान केंद्रावर गुलाबपुष्प देऊन स्वागतही करण्यात आले. 

दापूर गावातील समस्या कायम असल्याने येथील ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. लोकसभा निवडणुकीतही ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने शून्य टक्के मतदान झाले होत. या वेळीसुद्धा विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत दापूर येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. ग्रामस्थांच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले व ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. 

गावातील युवक मतदारांना लोकशाही व्यवस्थेबद्दल, ग्रामसभेतील त्यांच्या सहभागाबद्दल समजावून सांगितले. युवकांनी ग्रामसभेच्या माध्यमातून कशा प्रकारे आपले प्रश्न सोडविले पाहिजेत, याबद्दल चर्चा केली. तसेच लोकशाहीत नकारात्मक भूमिका न ठेवता सहभागातून प्रश्नांची सोडवणूक करता येते, ही प्रक्रिया समजावून सांगत विधानसभा निवडणुकीत टाकणारा येणारा बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला दापूर ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आज मोठ्या प्रमाणात मतदान केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com