ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दत्तात्रेय पेंडसे यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - टाटा समूहाचे माजी अर्थतज्ज्ञ दत्तात्रेय पेंडसे (वय 87) यांचे सोमवारी (ता.21) मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. पेंडसे यांनी अर्थ खाते, वाणिज्य मंत्रालयात वरिष्ठ पदावर काम केले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या नियोजन मंडळावर पेंडसे दीर्घकाळ सदस्य होते. त्यांनी गोवा राज्याच्या सातव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपद भूषविले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांवर; तसेच इंडियन मर्चंट चेंबर, शेअर बाजार या संस्थांवर त्यांनी काम केले. टाटा समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ असलेल्या पेंडसे यांचे जे. आर डी टाटांसोबत घनिष्ट संबध होते.

जे. आर.डींवर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यांनी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे सरकारी संस्थांसोबत काम केले आहे. 1996 मध्ये महाराष्ट्र सरकारने पेंडसे यांना सी. डी. देशमुख स्मृती पुरस्कारने सन्मानित केले होते.

Web Title: dattatreya pendse death