दाऊदच्या आणखी एका मालमत्तेचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या शेवटच्या मालमत्तेचा लिलाव गुरुवारी झाला. दक्षिण मुंबईतली त्याच्या मालकीची "अमिना मॅन्शन' ही इमारत सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीएटी) तीन कोटी 51 लाख रुपयांना विकत घेतली आहे. यापूर्वीच्या मालमत्ताही एसबीएटीने खरेदी केल्या होत्या.

केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने सफेमा कायद्यांतर्गत या मालमत्तांचा लिलाव केला. 1993 च्या बॉबस्फोटानंतर दाऊदच्या एकूण 10 मालमत्ता सरकारने जप्त केल्या होत्या. त्यातील महत्त्वाच्या तीन मालमत्तांचा नोव्हेंबरमध्ये लिलाव झाला होता. त्यामध्ये रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाउस यांचा समावेश होता. या लिलावात रौनक अफरोझ हॉटेलसाठी 4.53 कोटी, शबनम गेस्ट हाउससाठी 3.53 कोटी आणि डांबरवाला इमारतीसाठी 3.53 कोटी रुपये एवढी बोली लावण्यात आली होती. सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने 11.50 कोटींना त्या विकत घेतल्या.

Web Title: dawood ibrahim property auction