दाऊदचा बर्थडे, डोंगरीमध्ये सेलिब्रेशन..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 December 2019

दाऊद इब्राहिमचे हितचिंतक कोण?

मुंबई : दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसलाय. मात्र त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन मुंबईत केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काय आहे हासगळा प्रकार, जाणून घेऊयात. 

बर्थडे सेलिब्रेशनचे हे फोटो, आणि सोशल मीडियावरुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलेल्या या शुभेच्छा कराचीतून नाहीत. तर मुंबईतून दिल्यात. शेरा चिकना नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले होते, त्यानंतर काही तासांत हे फोटो जोरात व्हायरल झाले.

महत्त्वाची बातमी :  रात्रीच्या घोळाची चमचमीत गोष्ट...

फोटोंखाली हॅपी बर्थडे बॉस असा मेसेजही लिहिला. या फोटोंची मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. फोटो शेअर करणाऱ्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

महत्त्वाची बातमी : 'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...

पोलिसांच्या मते या तरुणांनी दाऊद इब्राहिमच्या वाढदिवशी अनेक केक कापलेत. दरम्यान पोलिस आता या बर्थडे पार्टीत कोण कोण हजर होते याचा शोध घेतेय.  दाऊद पाकिस्तानात लपून बसल्याची भारतीय गुप्तचर विभाग (IB) ला आहे. त्यामुळे, त्या दिवशी पाकिस्तानमध्ये कुणी व्हिडीओ कॉल केला का याचा देखील पोलिस आता शोध घेतायत.   

महत्त्वाची बातमी : शेतकरी कर्जमाफी मिळणार पण कंडीशन्स अप्लाय..

दाऊद इब्राहिम 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानात लपून बसलाय. पाकिस्तानात बसून त्याच्या भारताविरोधात कारवाया सुरुच आहेत. देशाच्या शत्रुचा वाढदिवस साजरा करुन त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकण्याची हिम्मत करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवलीच पाहिजे.

WebTitle : dawood ibrahims birthday celebrated in dongari mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dawood ibrahims birthday celebrated in dongari mumbai