मोदींनी झेंडा दाखविलेली 'वंदे भारत' एक्स्प्रेस चार तास लेट

train
train

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या सेमी हायस्पीड ट्रेनच्या पहिल्याच प्रवासी फेरीला तांत्रिक बिघाडामुळे रखडपट्टीचा सामना करावा लागला. कानपुर मधील टूडंला स्टेशन दरम्यान पहाटे 5.30 वाजता बंद पडलेली वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 8.30 वाजता सुरू करून, नवी दिल्ली येथील कारशेड पाठवण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी सेमी हायस्पीड एक्सप्रेस पहिल्याच दिवशी अपयशी ठरली. नवी दिल्ली ते वाराणसी ही एक्सप्रेस धावणार आहे. वाराणसी हा मोदींचा मतदार संघ आहे. त्यामुळे या मार्गावरील मतदारांना खुश करण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झंडी दाखवण्यात आले असल्याची शुक्रवारी सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत्या. त्यानंतर पहिल्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेसच्या अत्याधुनिक यंत्रणा अपयशी ठरल्या, वाराणसी वरून नवी दिल्ली परत जाताना ही घटना घडली.

कानपूरजवळील तुंडला स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पहाटे साडे पाचच्या सुमारास या अत्याधुनिक गाडीला ब्रेक डाऊनचा सामना करावा लागला. घर्षणामुळे चाके जाम झाल्याने ही गाडी अडकली. गाडीच्या सर्व यंत्रणा संगणक संचालित असल्याने सिस्टीम डाऊन होत चार डब्यांतील वीज देखील गेली. त्यामुळे यागाडीतील प्रवाशांना विक्रमशीला एक्सप्रेस मधून दिल्लीला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या गाडीला ताशी १३० किमीच्या वेगाने चालवतानाच चाकांच्या घर्षणामुळे त्यातून जळण्याचा वास येत होता अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे या गाडीला रात्रीच्या प्रवासासाठी आवश्यक उपकरणे नसल्याचे समजते.

वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी नवी दिल्लीहून वाराणसी पर्यंत धावली. त्यामध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अद्यक्ष, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) चे मुख्य तांत्रिक अभियंता आणि रेल्वे बोर्डाचे इतर महत्वाचे सर्व अधिकाऱ्यांनी वंदे भारत मध्ये प्रवास केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com