Daya Nayak : वेटरचं काम करणारा दया नायक 'दबंग' एन्काऊंटर स्पेशालिस्ट कसा बनला ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daya Nayak

Daya Nayak : वेटरचं काम करणारा दया नायक 'दबंग' एन्काऊंटर स्पेशालिस्ट कसा बनला ?

एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामध्ये कार्यरत आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दया नायक यांचाही समावेश असून ते पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत.

दया नायक आता दहशतवादविरोधी पथकामध्ये कार्यरत आहेत. 2021 मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.

आज पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी अनेक एन्काऊंटरही केले आहेत. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.

दया नायक कोण आहेत?

1995 मध्ये दया नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले होते. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला होता. त्यांनी जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहे.

दया नायक मुळचे कर्नाटकातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्यांनी सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर ते 1979 ला मुंबईला आले. येथे दया एका हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलचा मालक दयाला पगार देत असे. त्यांनीच दयाला पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर पोलिसात नोकरी लागण्याच्या आधी आठ वर्षांपर्यंत दया नायक यांची ही नोकरी सुरू होती. त्याचबरोबर दया यांनी काही दिवसांपर्यंत 3000 रुपये प्रति महिना अशा रोजावर नोकरीही केली आहे.

टॅग्स :mumbai police