दया शंकरला चार वर्षांची सक्‍तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई  - लाचखोरीचा आरोप असलेला आयकर अधिकारी दया शंकरला आज विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सात वर्षांपूर्वी तत्कालीन आयकर अधिकारी असलेल्या शंकरने आयकर परताव्याच्या एका प्रकरणामध्ये दोन लाख रुपयांची लाच मागितली होती, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी विशेष सीबीआय न्या. एम. जी. देशपांडे यांच्यापुढे सुनावणी झाली. आरोपीने प्रारंभी 25 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, नंतर ही रक्कम दोन लाख करण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत सीबीआयकडे फिर्याद नोंदविली होती. 

Web Title: Daya Shankar Four years rigorous imprisonment

टॅग्स